आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ठाण्‍यातील डॉट प्लस केंद्र वैद्यकीय अधिका-याविना चालू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज दवाखान्यात डॉट प्लस केंद्रावर वैद्यकीय अधिकारी नसल्याने टीबीच्या रूग्णांची दैन्या होत आहे. ती तातडीने अधिकारी नेमून सोडावावी अशी मागणी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.

राज्य सरकारने डॉट प्लस केंद्रासाठी वैद्यकीय अधिका-याचे पद मंजूर केले आहे. मात्र त्या पदावर कोणाचीही नियुक्ती न झाल्याने पालिकेच्या रूग्णालयात टीबी रूग्णांची दररोज रूग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे लवकर वैद्यकीय अधिका-याची नेमणूक करावी, असे मनसेचे जिल्हा सचिव सुरेश कोलते यांनी सांगितले.