आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officers Beating Case : Former MLA Pappu Kalani Arrested

अधिका-यांना मारहाण प्रकरण: माजी आमदार पप्पू कलानीला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिका-यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार पप्पू कलानीला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसशी संबंधित बेकायदा बांधकाम पाडल्याबद्दल पप्पू कलानी व त्याच्या अंगरक्षकाने सोमवारी मनपा उपायुक्त शेखर भदाने व सहायक उपायुक्त सागर घोलप यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आल्याचे उल्हासनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. ओ. चव्हाण यांनी सांगितले.


कलानी व त्याच्या दहा अंगरक्षकांवर हल्ला व शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनपा उपायुक्त शेखर भदाने व कलानीने परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. कलानी यांनीही मनपा अधिका-यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कलानीच्या अंगरक्षकाला अद्याप अटक झाली नाही.