रत्‍नागिरीतील प्रेमी युगुलाने / रत्‍नागिरीतील प्रेमी युगुलाने केला हवेत साखरपुडा, पाहा PHOTOS

मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी
Jan 04,2016 12:56:00 PM IST
रत्‍नागिरी - 'प्रेम म्‍हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते,' हे सर्वश्रुत आहे. मात्र, आपले प्रेम इतरांपेक्षा वेगळे आहे, हे सिद्ध करण्‍यासाठी दापोली येथील एका सहासी प्रेमी युगुलाने मुरुड-कर्दे समुद्राच्‍या पात्रातून प्यारासेलिंगमधून उंच भरारी घेत आपला साखरपुडा पार पाडला. मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी अशी त्‍यांची नावे आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, साखरपुड्याचे थरारक फोटोज...
मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर दोन बोटी साखरपुड्या करिता सजवण्यात आल्या होत्या.बोटी सुम्रदात उतरल्यानंतर काही मिनिटांतच मनाली आणि रोहण यांनी प्यारासेलिंगच्या माध्यमातून उंच आकाशात भरारी घेतली.काही वेळ आकाशात उडाल्यानंतर त्यांनी एकमेकांना अंगठी घातली.दोघांनी एकमेकांना अंगठी घातल्यानंतर खाली बोटी असलेल्या नातेवाईकांनी एकच जल्लोष केला.या अनोख्या साखरपुड्याची दापोलीत सर्वत्र चर्चा होत आहे.
X
मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णीमनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी