आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाण्यात पेट्रोल तीन रुपयांनी स्वस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - देशात पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य माणूस त्यात भरडला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने पेट्रोलवरील जकात कमी करून वाहनचालकांना दिलासा दिला आहे. या शहरात आता वाहनचालकांना तीन रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळणार आहे. ठाण्यात आधीचा पेट्रोल दर प्रतिलिटर 78 रुपये 10 पैसे होता, परंतु महापालिकेने जकात कमी केल्याने आता वाहनचालकांना केवळ 75 रुपये 10 पैसेच मोजावे लागणार आहेत.