गर्भवती पत्नीसह पतीची / गर्भवती पत्नीसह पतीची अज्ञात व्यक्तीकडून हत्या, ठाणे जिल्ह्यातील घटना

प्रतिनिधी

Sep 17,2016 02:04:00 AM IST
ठाणे - गर्भवती पत्नीसह पतीची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील दहिघर येथे शुक्रवारी उघडकीस आली. विजय यादव (३०) आणि सोफिया अबरार ऊर्फ प्रिया विजय यादव असे मृत दांपत्याचे नाव आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात विजय आणि सोफिया यांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दहिघर येथे वास्तव्यास होते. दोन दिवसांपासून त्यांच्या घरातून वास येत असल्याने शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दोघांचे मृतदेह आढळून आले. शवविच्छेदनात सोफिया गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
X
COMMENT