महापालिकेच्‍या अधिकाऱ्याला जिवंत / महापालिकेच्‍या अधिकाऱ्याला जिवंत जाळण्‍याचा प्रयत्‍न; उल्‍हासनगरमधील थरार

दिव्‍य मराठी वेब टीम

Feb 20,2016 06:24:00 PM IST
ठाणे - उल्हानगर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना त्‍यांच्‍या कारसह शनिवारी जिवंत जाळण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. यात त्‍यांची गाडी जळून खाक झाली. परंतु, सुदैवाने ते सुखरुप बचावले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा नोंदवाला असून, अधिक तपास सुरू आहे.
नेमके काय झाले...
- शनिवारी दुपारी जनसंपर्क अधिकारी भदाणे हे आपल्या कार बसत होते.
- अचानक हेल्मेट परिधान केलेल्या दोन अज्ञात व्‍यक्‍तींनी भदाणे यांच्या दिशेने ज्वलनशील पदार्थ फेकले.
- कारने तात्काळ पेट घेतला.
- प्रसंगावधान राखत भदाणे यांनी मोटारीतून बाहेर उडी मारली.
- आगीत मोटार जळून खाक झाली.
- भदाणे यांच्यावरील हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

X
COMMENT