महाराष्‍ट्राच्या नक्षली भागात / महाराष्‍ट्राच्या नक्षली भागात वाढली चीनी लोकांची संख्या

वृत्तसंस्था

Feb 04,2013 11:51:00 AM IST

ठाणे - महाराष्ट्रात स्थायिक होणा-या परदेशी नागरिकांच्या संख्येत 2005 पासून वाढ हात आहे. यात कोकणातील रायगड आणि विदर्भातील नक्षलग्रस्त गडचिरोली हे जिल्हे आघाडीवर आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही बाब उघड झाली आहे.

भाजपचे माजी आमदार संजय केळकर यांनी रायगड पोलिसांकडून परदेशी नागरिकांच्या संख्येची माहिती मागवली होती. या आकडेवाडीनुसार रायगड जिल्ह्यात एकूण 700 परदेशी नागरिक 2005 पासून तळ ठोकून आहेत. यात सर्वधिक म्हणजे 211 कोरियन, त्याखालोखाल 204 पाकिस्तानी, तर 116 चीनचे नागरिक राहतात. नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही चिनी नागरिकांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. 2011 च्या आकडेवाडीनुसार तेथे 108 चिनी नागरिकांचे वास्तव्य आहे, तर वर्धा येथे हीच संख्या 60 एवढी आहे.
उस्मानाबाद येथेही पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य आहे. सध्या जिल्ह्यात 6 पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. 2004 मध्ये 14 पाक नागरिक येथे राहत होते, तर 2006 मध्ये हीच संख्या वाढून 31 झाली. वर्षभरात हा आकडा 40 वर पोहोचला. मात्र, 2012 मध्ये संख्या घटून 6 एवढी झाली.

काही एसपींचा नकार
1993 मध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले त्या वेळी रायगड येथील शेखडी बंदराचा शस्त्रात्रे उतरवण्यासाठी वापर करण्यात आला होता. त्यामुळे येथील सुरक्षा धोक्यात आली होती. पोलिसांनी यावर वेळीच उपाययोजना कराव्यात. राज्यातील प्रत्येक जिल्हा पोलिस अधीक्षकांना आपण परदेशी नागरिकांच्या संख्येबाबत पत्र पाठवले आहे. मात्र, काही जिल्हा अधीक्षकांनी याबाबतची माहिती देण्यास नकार दिल्याचे
केळकर म्हणाले.

परदेशींची संख्या
रायगड कोरियन 211, चीन-116, पाकिस्तान-204,
गडचिरोली चीन 116, वर्धा- 60
उस्मानाबाद पाकिस्तान 6

X
COMMENT