Home | Maharashtra | Kokan | Thane | Pune bus accident news in Marathi, Maharashtra

पुण्याच्या बसची ठाण्याजवळ डिझेल टॅंकरला जोरदार धडक; 8 जणांचा होरपळून मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 29, 2014, 12:11 PM IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावर काल रात्री दिडच्या सुमारास लक्झरी बस डिझेल टॅंकरला धडकल्याने भीषण अपघात झाला.

 • Pune bus accident news in Marathi, Maharashtra
  मुंबई- मुंबई अहमदाबाद महामार्गावर काल रात्री दिडच्या सुमारास लक्झरी बस डिझेल टॅंकरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 8 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर इतर 14 जण गंभीर जखमी झाले आहेत.
  मिळालेल्या माहितीनुसार, ही लक्झरी बस पुण्याहून अहमदाबादला जात होती. बस जेव्हा पालघर तालुक्यातील मनोर पोलिस स्टेशनजवळ असलेल्या कुडे या गावाजवळ आली, तेव्हा ती रस्त्याच्या कडेला थांबलेल्या डिझेल टॅंकरला धडकली. अपघात होताच टॅंकरमधील डिझेलने पेट घेतल्याने या प्रवाशांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला
  रात्री जवळपास 1.45 च्या सुमारास हा अपघात झाला. डिझेलने भरलेला टॅंकर (बीपीसीएल) गुजरात येथील हझीरा येथे जात होता.
  प्रारंभिक अहवालानुसार, या दुर्घटनेतील सर्व जखमी हे बसमधील आहेत. आगीत होरपळल्यामुळे मृतांची ओळख पटणे अशक्य झाली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहे.
  जिल्हा प्रशासनाकडून बसमधील प्रवाशांची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचेही पुरेपुर प्रयत्न सुरू आहेत, असे ठाण्याचे जिल्हाधिकारी पी. वेलरसू यांनी सांगितले आहे.
  या अपघातातील जखमींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अपघातानंतर लगेच पोलिस तसेच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
  या पूर्वी 29 मे रोजी असाच लक्झरी बस आणि डिझेल टॅंकरचा अपघात झाला होता. त्या अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले होते.

Trending