आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रत्‍नागिरीमध्‍ये पिकनिकसाठी गेलेल्‍या दोन तरुणांचा समुद्रात बुडून अंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय मोरे आणि  रवी पाटील - Divya Marathi
अक्षय मोरे आणि रवी पाटील
रत्नागिरी - जिल्‍ह्यातील दापोली येथील कर्दे समुद्र किना-यावर पिकनिकसाठी आलेल्‍या पाच तरुणांपैकी दोघांचा बुडून करुण अंत झाला. ही घटना शनिवारी घडली. अक्षय मोरे आणि रवी पाटील अशी त्‍यांची नावे असून, ते पुण्‍यातील दिघी येथील रहिवाशी आहेत.
अक्षय आणि रवि हे दोघे शनिवारी त्‍यांच्‍या इतर तीन मित्रांसोबत पिकनिकसाठी दापोली येथील समुद्र किना-यावर गेले होते. दरम्‍यान, समुद्रात उतरलेत. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्‍यामुळे ते खोल पाण्‍यात गेले. त्‍यात त्‍यांचा बुडून मृत्‍यू झाला. एक तासाच्‍या शोध मो‍हिमेनंतर पोलिस आणि अग्‍नीशमन दलाच्‍या कर्मचा-यांनी त्‍यांचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...