आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्ववादी संघटनांचा जाणीवपूर्वक छळ : वर्तक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मडगाव - बाॅम्बस्फोटप्रकरणी सनातन संस्थेच्या साधकांना ४ वर्षांनी निर्दोष मुक्त केले; पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला अटक करून ८ महिने झाले, तरी अद्याप एकही पुरावा तपास यंत्रणांकडे नाही, त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई चालू आहे; अशातच आता डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली. यामधून हिंदुत्ववादी संघटनांचा जाणीवपूर्वक छळ करण्याचे कारस्थान आहे, असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वर्तक यांनी सनातनवर आकसाने होत असलेल्या कारवायांची माहीती दिली. काही दिवसांपूर्वी सनातनच्या पुण्यातील १५ साधकांची चौकशी झाली. यापैकी दोन जणांच्या पॉलिग्राफीक टेस्टची मागणी सीबीआयने केली. ती मान्य करत सनातनने या प्रकरणी पूर्णतः सहकार्य केले. या टेस्टचे पुढे काय झाले, हे समजले नाही. सप्टेंबर २०१५ मध्येच डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी तपास करणारे सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांच्याविरोधात आम्ही पत्रकार परिषद घेऊन उच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढलेल्या अधिकाऱ्याची या प्रकरणी नियुक्ती केल्याचे म्हटले होते. नायर हे सनातनला मुद्दामहून गोवतील, असे आमचे म्हणणे होते आणि ते आज खरे ठरले. शुक्रवारी डॉ. तावडे यांना अटक करून सनातनला गोवण्यासाठीच सीबीआयने हे पाऊल पुढे टाकले, अस वर्तक म्हणाले.

डॉ. तावडे ते सनातनच्या पनवेल येथील आश्रमात साधना करण्यासाठी येत असत. २००७ पूर्वी ते हिंदू जनजागृती समितीत कार्यरत होते. काही कौटुंबिक कारणांमुळे ते घरी राहून साधना करत होते. उद्या कलबुर्गी हत्येप्रकरणीही सनातनच्या आणखी काही निर्दोष साधकांना गोवून अटक
करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल, असे ते म्हणाले.
पुढे वाचा...
>पहिली अटक हा चुकीचा प्रसार
>गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप
बातम्या आणखी आहेत...