आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध, सांस्‍कृतिक मंत्री तावडेंची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड - ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सर्व जगापुढे यावा, जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर रायगड यावा, या उद्देशाने रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे वैभव आणि इतिहासाची साक्ष असलेले गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध अाहे,’ असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केले.

किल्ले रायगड व पायथा पाचाड येथे अायाेजित रायगड महाेत्सवाच्या समाराेप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार विनायक मेटे, युवराज संभाजीराजे छत्रपती, इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, कला दिग्दर्शक नितीन देसाई उपस्थित होते. पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित हाेते. गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने घेतलेल्या धोरणाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, ‘रायगड महोत्सवाच्या निमित्ताने येथे शिवसृष्टी जिवंत करण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. देशी-परदेशी पर्यटक याठिकाणी येण्यासाठी येथे भोजन व निवासाची उत्तम सोय करावी,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.