आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणॆ - रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज हटविला. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी दावा केला आहे की, इतिहासात वाघ्याचा कुठलाच उल्लेख नाही. संभाजी ब्रिगेडने 6 जूनपूर्वीच पुतळा हटवण्याची मागणी केली होती आणि ती मान्य न झाल्यास तो उद्ध्वस्त करण्याचा इशारा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी दिला होता.

शिवरायांच्या काळात वाघ्या कुत्रा अस्तित्वात होता याबद्दल कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. असे असताना शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाशेजारी या कुत्र्याचा पुतळा उभारण्यात आला होता. तो हटवण्यात यावा यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली शासनाशी पत्रव्यव्हार सुरू होता. परंतु, लोकशाही मार्गाने केलेली ही मागणी लक्षात घेऊन जर शासन कार्यवाही करणार नसेल तर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पुतळा उध्वस्त करतील असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज ब्रिगेडने आक्रमक भुमिका घेत हा पुतळा हटविला आहे.