आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Gangman Death In Local Train Accident At Thane

लोकलची धडक बसून ट्रॅकमनचा मृत्यु; संतप्त कर्मचार्‍यांचे दोन तास रेलरोको आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- लोकलची धडक बसल्याने एका ट्रॅकमनचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोमवारी घडली. ही घटना ठाणे ते मुलुंड स्टेशन दरम्यान दुपारी दीड वाजेदरम्यान घडली. महादेव स्वामी असे मृत ट्रॅकमनचे नाव आहे. रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यु झाल्यानंतर संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांनी रेल रोको आंदोलन केले. कर्मचार्‍यांनी तब्बल दोन तास रेल्वे गाड्या रोखून ठेवल्या. यामुळे ठाण्याहून मुंबईकडे तसेच कल्याणकडे जाणार्‍या गाड्या रोखून धरल्याने काहीकाळ वाहतुकीचा ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे आणि मुलुंड स्टेशनदरम्यान कोपरी पुलाजवळ महादेव स्वामी हे आपल्या अन्य सहकार्‍यासोबत रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम करत होते. यादरम्यान स्वामी हे धावत्या लोकलखाली दोन भागात कापले गेले. या घटनेनंतर संतप्त रेल्वे कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. एवढेच नाही तर फलाट क्रमांक दोन आणि तीनवर रेल रोको करून आंदोलन केले.
आंदोलनामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती.

संतप्त रेल्वे कर्मचार्‍यांनी प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.प्रशासनाकडून ट्रॅकवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कुठलीही सुरक्षाव्यवस्था दिली जात नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांचा मृत्यु होतो. त्याचे कुटुंबिया रस्त्यावर येतात. असा आरोप कर्मचार्‍यांनी यावेळी केला.

दरम्यान, रेल्वेच्या अधिकार्‍यांनी मध्यस्थी करून संतप्त कर्मचार्‍यांची समजूत काढली. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास कर्मचार्‍यांनी आंदोलन थांबवले.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, संतप्त रेल्वे कर्मचार्‍यांनी केलेल्या रेल रोको आंदोलनाची छायाचित्रे...