Home | Maharashtra | Kokan | Thane | Raj Thackeray On Terrorist Bihaar

ग्रहांच्या अंगठ्या समुद्रात विसर्जित केल्या तेव्हा बरं वाटलं - राज ठाकरे

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Aug 31, 2013, 03:49 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळ याच्या बिहारमध्ये झालेल्या अटकेवरून उत्तर भारतीयांवर पुन्हा निशाणा साधला आहे.

 • Raj Thackeray On Terrorist Bihaar

  ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळ याच्या बिहारमध्ये झालेल्या अटकेवरून उत्तर भारतीयांवर पुन्हा निशाणा साधला आहे. दहशतवादी भटकळला बिहारमध्ये आसरा मिळतोच कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. येथील एका कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. याचवेळी अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा बाऊ करु नका, असे सांगत राज यांनी स्वतःच्या अंगठ्या विसर्जित करण्याचा किस्सा सांगितला. (पुढील स्लाइडमध्ये वाचा, राज ठाकरेंनी का केल्या अंगठ्या विसर्जित)

  दहशतवादी बिहारमधून पकडला जातो, आणि आम्ही उत्तर भारतीयांविरोधात बोललो की, दोष आम्हाला दिला जातो, असे राज म्हणाले. ते ऐवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी राज्यात वाढत असलेल्या परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप केला. या लोंढ्यांना वेळीच रोखले पाहिजे, तरच गुन्हेगारी थांबेल, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी आहे आणि तिथेच गुन्हेगार व दहशतवाद्यांना आसरा दिला जातो.

 • Raj Thackeray On Terrorist Bihaar

  नरेंद्र दाभोलकरांचा श्रद्धेला विरोध नव्हता, तर श्रद्धेच्या नावावर सुरु असलेल्या ढोंगबाजीला त्यांचा विरोध होता असे सांगत जादूटोणा विरोधी कायद्याचा उगाच बाऊ करु नका असे राज ठाकरे यांनी सांगितले.

  श्रद्धा - अंधश्रद्धेवर बोलत असतानाच राज यांनी आपल्या हातांकडे इशारा करत, कोणी तरी सल्ला दिला म्हणून माझ्याही बोटांमध्ये अनेक प्रकराच्या खड्यांच्या आणि ग्रहांच्या अंगठ्या असायच्या. ती बोटं पाहून मला मी मोगॅम्बो असल्याचे वाटू लागले होते. त्यामुळे त्या सर्व अंगठ्या काढल्या आणि समुद्रात विसर्जित केल्या, तेव्हा मला मोकळे वाटले ! असे त्यांनी सांगितले.

 • Raj Thackeray On Terrorist Bihaar

  या कार्यक्रमात, राज यांनी समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येवरून
   राज्य सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, अंधश्रद्धेमुळे अनेकांची दुकानदारी चालेत, त्यांच्याच विरोधात दाभोलकरांचे आंदोलन होते. दाभोलकरांचे काम शंभर टक्के योग्य होते. मनसेचाही त्यांच्या कामाला पाठिंबा होता आणि त्यांचे राहिलेले काम पुढे नेण्यासाठी मनसे प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 • Raj Thackeray On Terrorist Bihaar

  राज्यातील गुन्हेगारी रोखण्यात राज्य सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्याएवजी ते, गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे केवळ आश्वासन देत राहातात, असा टोला राज यांनी हाणला.

Trending