आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोगाकडे आताच पुरेसी मतदान यंत्रे का नाही? राज ठाकरे यांचा सवाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - एकाच दिवशी जिल्‍हा परिषद आणि महापालिकांचे निकाल लावणे शक्‍य असताना निवडणूक आयोगाला कशाची घाई झाली आहे, असा सवाल करुन महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. आयोगावर सरकारचा दबाव असल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला.
महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेच्या इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती घेण्यासाठी राज ठाकरे आज ठाण्यात आले आहेत. त्यावेळी त्यांनी निवडणुक आयोगाच्या वेगवेगळ्या दिवशी निकाल लावण्याच्या भूमिकेला विरोध केला. याबाबत बोलताना राज म्हणाले, निवडणूक आयोग हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करीत आहे. जिल्हा परिषदेचा निकाल लावण्यामागे विशिष्ट हेतू आहे. ग्रामीण भागात काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तेथे त्यांना चांगले वातावरण असल्यानेच सरकार निवडणुक आयोगावर दबाव टाकत आहे. राज्यातील 27 जिल्हा परिषदा व 10 महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी एकाचवेळी होण्यासाठी लागणारी मतदानयंत्रे पुरेशी उपलब्ध नसल्याचे सत्यनारायण यांनी सांगितले होते. हा धागा पकडत राज म्हणाले, लोकसभा निवडणूक देशभर होते तेव्हा मतदान यंत्राची कमतरता भासत नाही मग आता कशी काय भासते. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूक होत असताना इतर राज्यात निवडणुक होत नाहीत मग अशावेळी इतर राज्यांमधून मतदानयंत्रे का मागवत नाही, असा प्रश्नही राज ठाकरे यांना उपस्थित केला.

मी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्याशी फोनवर बोललो आहे. तसेच त्यांना एकाच दिवशी निकाल लावावा अशी विनंती केली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे एकाच दिवशी निकाल लागेल अशी मला आशा आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी मनसेने इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली आहे. परीक्षा व मुलाखती दिल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाणार नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या भाषणाची सीडी निवडणूक आयोग तपासणार!
अमिताभबद्दल बोलायची लायकी नाही; राज ठाकरे यांचा यू टर्न