आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thakre Slams Election Commission Over Clean Chit Given To Ajit Pawar

अजित पवारांना क्लिन चिट कशी? राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणेः उपमुख्‍यमंत्री अजित पवारांना क्लिन चिट दिल्‍यानंतर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली आहे. आयोगाच्‍या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित करताना अजित पवारांना क्लिन चिट कशी देण्‍यात आली, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी ठाण्‍यामध्‍ये इच्‍छुकांच्‍या मुलाखती घेतल्‍या. त्‍यावेळी त्‍यांनी निवडणूक आयोगावर पुन्‍हा टीका केली. ते म्‍हणाले, अजित पवारांना क्लिन चिट कशी देण्‍यात आली. उद्या मीही चूक करुन दिलगिरी व्‍यक्त करीन. मलाही क्लिन चिट देणार काय? अशा निवडणूक आयोगाची काय गरज आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला. याशिवाय राज ठाकरे यांनी माघी गणेशोत्‍सव उत्‍साहात साजरा करण्‍याचे आवाहनी केले.
अजित पवारांना निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग प्रकरणी क्लिन चिट दिली. शिवाजीनगर येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन पवारांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले होते. त्‍यावेळी आचारसंहिता लागू झाली होती. यासंदर्भात भाजपने तक्रार केली होती. त्‍यानंतर आयोगाने पवार यांन कारणेदाखवा नोटीस दिली होती. या नाटीसीला उत्तर देताना अजित पवारांनी दिलगिरी व्‍यक्त केली होती. त्‍यानंतर मुख्‍य निवडणूक आयोगांनी पवारांचा खुलासा मान्‍य करुन, हे प्रकरण संपल्‍याचे जाहीर केले होते. निवडणूक आयोग हे राज्‍य सरकारच्‍या दबावाखाली काम करीत असल्‍याची टीका राज ठाकरे यांनी यापुर्वीच केली होती. राज ठाकरे यांनी आयोगाच्‍या कार्यपद्धतीवरही टीका केली होती. जिल्‍हा परिषद आणि महापालिकेची मतमोजणी एकाच दिवशी घेण्‍यावरुन राज ठाकरेंनी आयोगावर तोफ डागली होती. लोकसभेसाठी मतदान यंत्रांची कमतरता भासत नाही. मग आताच का, असा सवालही राज यांनी केला होता.
निवडणूक आयोग सरकारच्या दबावात - राज ठाकरे
आचारसंहिता भंगप्रकरणी अजित पवारांची लेखी दिलगिरी
ठाकरे, पवार आणि निवडणुकीचा पव्वा !
राज ठाकरे यांच्या भाषणाची सीडी निवडणूक आयोग तपासणार!