मोलकरणीवर चौघांचा सामूहिक / मोलकरणीवर चौघांचा सामूहिक बलात्कार

दिव्‍य मराठी

Dec 29,2016 03:40:00 AM IST
ठाणे - एका ४५ वर्षीय मोलकरणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ठाणे येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी उल्हास मोरे, गणेश मोरे, निकुंज रावल आणि दीपक शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मोलकरणीने पाेलिसांत तक्रार दिली आहे. पीडित महिला ही घरकाम करून उदरनिर्वाह करते. काही दिवसांपूर्वी चौघांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी एकाला अटक केली असून तिघे फरार झाले आहेत.
X
COMMENT