आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rashtravadi Paty Leader Jitendra Avhad & Vasant Davkhare Compromisein Thane

आव्हाड-डावखरे यांच्यात दिलजमाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: ठाण्यातील राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमधील संघर्षामुळे अडचणीची स्थिती आली असताना रविवारी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना तिळगूळ देऊन दिलजमाई केल्याने राष्ट्रवादीच्या जिवात जीव आला आहे.
जितेंद्र आव्हाड आणि वसंत डावखरे या दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून विस्तव जात नाही. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी वसंत डावखरे यांच्या सर्मथकांनी शिवसेनेत प्रवेश घेण्यास सुरुवात केली होती. ठाण्यात वर्चस्व गाजवण्यावरून डावखरे आणि आव्हाड यांच्यात छुपे युद्ध सुरू होते. डावखरे शिवसेनेच्या जवळ असल्याने शिवसेना नेत्यांनी डावखरे सर्मथकांना फोडण्यास सुरुवात केली होती. याचा फटका राष्ट्रवादीला बसणार होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गोष्टीची दखल घेऊन या दोघांनाही दिलजमाई करण्याचे आदेश दिल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले.

अजित पवार यांच्या आदेशानुसार मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या दोन्ही नेत्यांनी दिलजमाई केल्याने राष्ट्रवादीपुढील संकट दूर झाल्याचे बोलले जात आहे.