Home | Maharashtra | Kokan | Thane | robbery in thane

ठाण्यात एकाच दिवशी चार घरफोड्या; लाखोंचा ऐवज लांबवला

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jan 28, 2013, 12:39 PM IST

सलग तीन दिवसांची सुटी आल्यामुळे बाहेरगावी गेलेल्या लोकांमुळे ठाण्यात चोरांचा सुळसुळाट सुटला आहे.

  • robbery in thane

    ठाणे- सलग तीन दिवसांची सुटी आल्यामुळे बाहेरगावी गेलेल्या लोकांमुळे ठाण्यात चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. चोरट्यांनी शहरात एकाच दिवशी चार घरे फोडून सुमारे एक ते दीड लाखांचा ऐवज लांबविला आहे. मुंब्र्यात दोन तर कळवा आणि ठाण्यात प्रत्येकी एका घरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

    दिव्यातील श्रीकृष्ण अपार्टंमेंटमध्ये राहणारे केणी कुटूंब सलग तीन ‍दिवसांच्या सुट्या आल्याने ते बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप बनावट चावीने उघडले. 15 हजार रूपयांची रोकड आणि मोटारसायकल चोरली. तसेच श्री अपार्टंमेंटमध्ये राहणारे कारंडे यांच्या घर फोडून चोरट्यांनी साडे नऊ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
    महागिरीमधील सुरज अपार्टंमेंटमध्या क्षीरसागर यांचे घर फोडून चोरट्यांनी साडे 66 हजार रुपयांचा तर कोथमिरे यांच्या बंद घरातील 20 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी कळवा पो‍लिस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Trending