आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहापूर हत्याकांडातील दोघांना जन्मठेप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण- शहापूर तालुक्यातील गुंडे गावात जमिनीच्या वादातून झालेल्या हत्या प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने नऊ आरोपींपैकी दोघांना जन्मठेपेची शिक्षा, चार जणांना एक वर्षाची कैद तर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
गुंडे गावातील योगेश वारघडे या तरूणाची एक ऑगस्ट 2008 रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी बापू बडेराव, महेंद्र बडेराव, मोहन देशमुख, दशरथ बडेराव, अनिल बडेराव, एकनाथ बडेराव, भूषण बडेराव, रफिक शेख आणि अशोक विशे यांना मुरबाड पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची अंतिम सुनावणी सोमवारी झाली. त्या वेळी किरण बडेराव व मोहन देशमुख या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. महेंद्र, दशरथ, अजित आणि एकनाथ बडेराव यांना एक वर्षाची कैद व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे. मात्र भूषण बडेराव, रफिक शेख व अशोक विशे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.