डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त / डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वांगणीत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

Apr 24,2013 04:19:00 PM IST

ठाणे- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक- 2 मध्ये संकल्प ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.
वांगणीचे सरपंच खंडेराव कालेकर, उपसरपंच सुखदेव पडवळ, सरचिटणीस एकनाथ शेलार, ग्रामपंचायत सदस्या योजना सांळुखे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता महेंद्र साळवे, सॅम्युअल कांबळे, माजी सरपंच विजय पावस्कर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक घन:श्याम युवराज कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणाली हांजणीकर, सुचेता चिपळूणकर, संदीप जाधव, सौरव नागवेकर, सौरव खताते, स्नेहा शिवाळे, सिद्धेश प्रभु, अमोल काळे, समृद्धी पाडगावकर, अविनाश जंगले, समीर कांबळे, सुलेखा कांबळे, हेता मेहता या संकल्प ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

X