Home | Maharashtra | Kokan | Thane | sharad pawar denies allegations about sugar factories scam

मनोहर जोशींना खिंडीत पकडू नका- शरद पवारांचा मिश्किल टोला

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Oct 12, 2013, 05:11 PM IST

साखर कारखाना खरेदी-विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप पवारांनी फेटाळला आहे.

 • sharad pawar denies allegations about sugar factories scam

  रोहा (रायगड)- साखर कारखाना खरेदी-विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवारां यांनी फेटाळला आहे. सध्या उठसुट आरोप करणे ही आता फॅशन झाली आहे. अशा प्रकारे आरोप करणारे विचारवंत आणि गणित तज्ञ झाल्‍याचा टोलाही पवारांनी लगावला. फेब्रुवारीमध्‍ये राज्‍यसभा निवडणूक लढविणार असल्‍याचे पवार यांनी सांगितले.

  रोहा येथील पत्रकार परिषदेत बोलत शरद पवार यांनी अनेक मुद्यांना स्‍पर्श केला. महाराष्ट्रात मोडकळीस आलेल्या साखर कारखान्यात कोट्यवधींचा घोटाळा झाला, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केला होता. त्यानंतर पवारांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

  शरद पवार म्हणाले, 'सध्या उठसुट आरोप करणे ही आता फॅशन झाली आहे. देशाचे सहकार खातेही माझ्याकडे आहे. मात्र, अशा प्रकारचा घोटाळा झाल्याची आपल्याला माहिती नाही. सहकारामुळे उलट महाराष्ट्राचा विकासच झाला आहे. अशाप्रकारचे आरोप करणारे विचारवंत आणि गणित तज्ज्ञ झाले आहेत, असे पवार म्‍हणाले.

  आणखी काय म्‍हणाले शरद पवार... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..

 • sharad pawar denies allegations about sugar factories scam

  आगामी निवडणुकांबाबत शरद पवार यांनी सांगितले, मी फेब्रुवारीत राज्‍यसभेची निवडणूक लढविणार आहे. लोकसभेच्‍या जागावाटपाबाबत राष्‍ट्रवादीची भूमिका सामंजस्‍याची आहे. त्‍यामुळे लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात तोडगा निघेल, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढावे अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही एकत्र लढू असा विस्वासही पवारांनी व्यक्त केला. राष्‍ट्रवादी कॉंग्रेस 22/26च्‍या फॉर्म्‍युलावर ठाम आहे. कॉंग्रेसने मात्र जास्‍त जागा मागितल्‍या आहेत.

   

 • sharad pawar denies allegations about sugar factories scam

  शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्‍यानंतर मनोहर जोशींनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्‍यावरही नाराजी व्‍यक्त केली होती. त्‍यामुळे मनोहर जोशी शिवसेना सोडतील की काय अशी चर्चा सुरु झाली. यावर शरद पवारांना म्‍हणाले, जोशीसर शिवसेना सोडतील असा विचार करणेही चुकीचे आहे. त्‍यांना खिंडीत पकडू नका, असे मिश्किल विधानही पवारांनी केले.

Trending