Home | Maharashtra | Kokan | Thane | Sharad Pawar on Gujrat Police

इशरत जहाँला मोदी व गुजरात पोलिसांनी मारले, कृषिमंत्री शरद पवार यांचा घणाघात

वृत्तसंस्था | Update - May 27, 2013, 12:30 PM IST

गुजरातचे मुख्यमंत्री आणि पोलिसांनी निष्पाप कॉलेज तरुणीला अतिरेकी ठरवत ठार मारल्याचा आरोप पवार यांनी केला.

  • Sharad Pawar on Gujrat Police

    ठाणे - मुंबईची रहिवासी इशरत जहॉँच्या बनावट चकमकीतील मृत्यू प्रकरणात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पोलिसांनी निष्पाप कॉलेज तरुणीला अतिरेकी ठरवत ठार मारल्याचा आरोप पवार यांनी केला.

    अतिरेक्यांना ठार मारणार्‍या पोलिसांचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी त्या वेळी दिली होती. चकमक गुजरात पोलिसांच्या शिरपेचातील तुरा आहे. मुंबई पोलिसांना त्यात अपयश आल्याचे ते म्हणाले होते, असे पवार यांनी रविवारच्या दौर्‍यात सांगितले. इशरत निरपराध होती. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढा दिला. 15 जून 2004 रोजी 19 वर्षीय इशरत जहॉँ, जावेद शेख ऊर्फ प्रकाश पिल्लई, अमजदअली अकबरअली राणा, झीसन जोहर यांना अहमदाबाद शहराबाहेर झालेल्या चकमकीत पोलिसांनी ठार केले होते. चौघे मोदी यांच्या हत्येसाठी इथे आले होते, असा दावा पोलिसांनी केला होता.

    दृष्टिकोन बदला
    राज्य सरकारने मुंब्रा भागातील वीज कपात हटवावी. ठरावीक समाजकंटकांच्या समाजविरोधी गैरकृत्याचा फटका सामान्यांना बसू नये, अशी अपेक्षा पवार यांनी सभेत केली. मुंब्रा समाजविरोधी घटकांचे आर्शयस्थान मानले जात होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे सरकार आणि समाजाने या भागाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, असे पवार म्हणाले.

Trending