आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात शिवसेना कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे । शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करत असताना पोलिसांनी सोमवारी रंगेहाथ अटक केली. या वेळी फाटक यांच्या कार्यकर्त्यांकडून साडेतीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी ५० जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाटक यांचे बंधू राजेंद्र फाटक, माजी नगरसेवक शैलेश सावंत आणि शिवसेनेच्या नगरसेविका कांचन चिंदरकर यांचे पती बाळा चिंदरकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात रवींद्र फाटक यांच्याविरोधात पैसे वाटपप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यभरात मतदारांना पैसेवाटपाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.