आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुणराजाच्या साक्षीने शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार शुक्रवारी पहाटे रिमझिम पाऊस व दाट धुक्याच्या साक्षीने रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजर, शिवरायांचा जयजयकार व मंत्रोच्चाराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


या सोहळ्यानिमित्त गुरुवारपासूनच शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावली होती. शुक्रवारी धारेश्वर (पाटण-सातारा) येथील नीलकंठ शिवाचार्य महाराज यांनी राज्याभिषेक सोहळ्याचे आचार्य म्हणून कर्तव्य पार पाडले. त्यांनी उपस्थित शिवप्रेमींना शिवाजी महाराजांच्या भेदरहित दृष्टिकोनाची प्रचिती आणून दिली.
राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान पुणे येथील विनय स्वामी यांनी मोती, पोवळे, हिरे वापरून तयार केलेला हार महाराजांच्या गडावरील पुतळ्याला अर्पण केला.