Home | Maharashtra | Kokan | Thane | Shivaji Maharaj's capital Raigad Fort

शिवाजी महाराजांनी रायगडालाच का केले राजधानी, जाणून घ्‍या इतिहास

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jan 22, 2016, 03:38 PM IST

शिवाजी महाराजांनी रायगडालाच का राजधानी केले, या किल्‍ल्‍याचा इतिहास काय, त्‍याचे प्राचिन नाव काय होते, यावर divyamarathi.com टाकलेला प्रकाश....

 • Shivaji Maharaj's capital Raigad Fort
  अलिबाग- किल्ले रायगडावर गुरुवारपासून रायगड महोत्सवास सुरूवात झाली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या महोत्सवात नागरिक, पर्यटकांना शिवकालीन युग अनुभवता येणार आहे. रविवारपर्यंत हा मोहोत्‍सव चालेल. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे या किल्‍ल्‍याविषयी खास माहिती...
  शिवाजी महाराजांनी रायगडाला केले राजधानी
  > शिवाजी महाराजांच्‍या स्‍वराज्‍याची राजधानी रायगड किल्‍ला होता.
  < याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्‍यामुळे या किल्‍लाला खूप महत्‍त्‍व आहे.
  > याच किल्‍ल्‍यावर शिवाजी महाराजांची समाधी आहे.

  पुढील स्‍लाइड्सवर वाचा, महाराजांनी रायगडालाच का दिला राजधानीचा दर्जा.... रायगडाचे प्राचिन नाव काय...निजामशाहीत रायगडाचा कशासाठी होत होता उपयोग... कशी आहे या किल्‍ल्‍याची बांधणी...कसा झाला महाराजांचा राज्‍याभिषेक... रायगडावर काय आहे पाहण्‍यासारखे...

 • Shivaji Maharaj's capital Raigad Fort
  गडाची संरक्षण भिंत
  महाराजांनी रायगडालाच का दिला राजधानीचा दर्जा
   
  > शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायगडास वेढा घातला होता.
  < पुढे एका महिन्‍यानंतर  हा किल्‍ला महाराजांच्या ताब्यात आला.
  > तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली.
  < त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला.
  > त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.
  < रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणा-या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.
   
  पुढील स्‍लाइडवर वाचा,  रायगडाचे प्राचिन नाव काय...
 • Shivaji Maharaj's capital Raigad Fort
  रायगडावरील एक बुरुज
  रायगडाचे प्राचिन नाव काय...
   
  > रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते.
  < युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत.
  > जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम.
  < पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता
  > त्‍याकाळी त्‍याला ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती.
  < त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्याला ‘नंदादीप’ असेही नाव पडले.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, निजामशाहीत रायगडाचा कशासाठी होत होता उपयोग...
 • Shivaji Maharaj's capital Raigad Fort
  रायगडाचे विहंगम दृश्‍य.
  निजामशाहीत रायगडाचा कशासाठी होत होता उपयोग...
   
  > निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई.
  < मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला.
  > महाराष्‍ट्रातील हा एक महत्‍त्‍वाचा किल्‍ला आहे.
   
  पुढील स्‍लाइडवर वाचा, कशी आहे या किल्‍ल्‍याची बांधणी...
 • Shivaji Maharaj's capital Raigad Fort
  रायगडाचे बुरूज
  कशी आहे या किल्‍ल्‍याची बांधणी...
   
  > हा किल्‍ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून, समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर (2700 फूट) उंचीवर आहे.
  < गडावर पोहोचायला जवळ-जवळ 1400-1450 पायऱ्या आहेत.  

  पुढील स्‍लाइडवर वाचा, कसा झाला महाराजांचा राज्‍याभिषेक...
 • Shivaji Maharaj's capital Raigad Fort
  गंगा सागर तळे, गडावरील पाण्याचा मुख्य स्रोत
  कसा झाला महाराजांचा राज्‍याभिषेक...
   
  > शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे.
  < मराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे.
  > 19 मे 1664 रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले.
  < तीन मण सोन्याचे म्हणजेच 56 हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, रायगडावर काय आहे पाहण्‍यासारखे...
 • Shivaji Maharaj's capital Raigad Fort
  किल्‍ल्‍यामध्‍ये प्रवेशासाठी असलेला एक दरवाजा
  रायगडावर काय आहे पाहण्‍यासारखे...

   > पाचाडचा जिजाबाईंचा वाडा
   < खुबलढा बुरूज
  > नाना दरवाजा
   < मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा
   > महादरवाजा
  < चोरदिंडी
  > हत्ती तलाव
  > गंगासागर तलाव
   
  पुढील स्‍लाइड्सवर पाहा, रायगडाचे फोटोज...
   
 • Shivaji Maharaj's capital Raigad Fort
  रायगडाचे एक प्रवेशद्वार
 • Shivaji Maharaj's capital Raigad Fort
  गंगासागर तलाव व टकमक टोक
 • Shivaji Maharaj's capital Raigad Fort
  रायगड किल्ला आणि त्यावरील टकमक टोक

Trending