आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solar Energy Groop Foundation At Z.p. School Goteghar, Di. Thane

जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा गोठेघर येथे 'सौरऊर्जा' मंडळाची स्‍थापना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- मित्रायु ग्रुपच्‍या वतीने जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा गोठेघर वाफे (केंद्र-सापगाव, ता- शहापूर) येथे सौरऊर्जा मंडळाची स्‍थापना करण्‍यात आली. सौरऊर्जातज्‍ज्ञ अभय यावलकर यांनी विद्यार्थ्‍यांना 'सौरऊर्जा काळाची गरज' या विषयावर मार्गदर्शन केले. त्‍यांनी दैनंदिन जीवनातील सौरऊर्जेच्‍या म‍हत्‍वाबद्दलची विद्यार्थ्‍यांना जाणीव करुन दिली. सूर्य हा ऊर्जेचा स्‍त्रोत कसा ठरु शकतो, याविषयीचे माहिती दिली.
मित्रायु मंडळाने सौरऊर्जेवर चालणारे दोन पंखे आणि दिवे शाळेला भेट दिल्‍याबद्दल कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी असलेले केंद्रप्रमुख, अरुण मडके यांनी मित्रायु मंडळाचे आभार मानले. या मंडळाचा आदर्श घेऊन आपणही समाजासाठी काही केले पाहिजे असा सल्‍लाही त्‍यांनी विद्यार्थ्‍यांना दिला.
कार्यक्रम प्रसंगी गोठेघर वाफेचे सरपंच संतोषी दळवी, उपसरपंच वंदना कोरडे, शालेय व्‍यवस्‍थापन समितीच्‍या अध्‍यक्षा संगीता कोरडे, उपाध्‍यक्ष वाळकु जाधव, सदस्‍य अशोक कोरडे, संजय दळवी, मुख्‍याध्‍यापिका मंगला जंगले आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काशीनाथ कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी मित्रायु मंडळातील सदस्‍य सुचिता चिपळूणकर, संदीप जाधव, प्रणाली हंजणकर, सुलेखा कांबळे, समीर कांबळे, अविनाश जंगले, सौरभ खताते, प्रिती ताम्‍हणकर, सौरभ नागवेकर, सिध्‍देश प्रभू, हेमा मेहता, समृध्‍दी पाडगावकर, अमोल काळे, स्‍नेहा शेवाळे आदींनी परिश्रम घेतले