आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांच्या उपस्थितीत पालघरमध्ये राष्‍ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचा शुभारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज पालघरमध्ये येत आहेत. त्यांच्या हस्ते येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाचा प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, स्वागतापासून आभार प्रदर्शनापर्यंतहा संपूर्ण कार्यक्रम १५ विद्यार्थी करणार आहेत. या कार्यक्रमात एकाही मंत्र्याचे भाषण होणार नाही असे राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री गुलामनबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

मंत्र्यांचे भाषण रद्द
शेट्टी यांनी सांगितले की, मुलांच्या आरोग्याबाबत योजनेचा कार्यक्रम असल्याने आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहोत. मंत्री, अधिकारी नेहमीच भाषणबाजी करत असतात. या वेळी आम्ही मुलांनाच सगळे कार्यक्रम करण्याची संधी देण्याचे ठरवले. सोनिया गांधी यांच्या स्वागतापासून त्यांची ओळख, योजनेची ओळख, आभार प्रदर्शन आणि शिबिरात माहिती देण्यापर्यंत सर्व कामे या मुलांकडेच सोपवण्यात आली आहेत. माझे भाषणही मी रद्द केले आहे. ही सर्व मुले पाचवी ते दहावीमधील असून आदिवासी मुलांचाही यात समावेश आहे.