आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोपोलीतील इंडिया स्ट्रील कंपनीत स्फोट; 15 जखमी, संतप्त जमावाकडून तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोपोली- खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीतील स्टील मोल्डिंग प्रकल्पात शुक्रवारी रात्री झालेल्या स्फोटात 15 जण जखमी झाले. या घटनेमुळे खोपोलीकर चांगलेच भयभीत झाले आहे. स्पोटानंतर लागलेल्या आगीने कंपनीच्या जवळपासच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींमुळे चिमुरड्यांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

स्फोट झाल्याची बातमी संपूर्ण शहरात पसरताच एकाच हाहा:कार माजला होता. त्यानंतर संतप्त जमावाने कारखान्यातील वाचमन केबिन,मुख्य कार्यालय, अनेक वाहने तसेच यंत्रांची तोडफोड केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जमाव शांत झाला. जमावाला शांत करण्‍यासाठी खालापूर, कर्जत, नेरळ, पाली, पेण आणि रसायनी येथील जादा पोलिस कुमक मागविण्यात आली होती. रात्री उशिरा पोलिस निरीक्षक संजय शुक्ल यांनी जखमी नागरिकांचे जबाब घेऊन नुकसानाचे पंचनामे केले.

दरम्यान, खोपोलीतील इंडिया स्टील कंपनी बंद करण्‍याची मागणी शहरातील जनतेने केली आहे. या स्ट्रील मोल्डिंग प्रकल्पामुळे शहराला धोका असल्याचेही जनतेने पोलिसांना सांगितले.