Home | Maharashtra | Kokan | Thane | ST Buses, Private Vehicles Still Missing

आणखी दोन मृतदेहांचा शोध, महाडमध्ये मृतांची संख्या 26; 16 अद्याप बेपत्ता

प्रतिनिधी | Update - Aug 08, 2016, 06:25 AM IST

सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल काेसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचे शाेधकार्य पाचव्या दिवशीही अविरत सुरु हाेते.

 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  महाड/मुंबई - सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल काेसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचे शाेधकार्य पाचव्या दिवशीही अविरत सुरु हाेते. शनिवारपर्यंत २४ मृतदेह शाेधण्यात यश अाले हाेतेे, तर रविवारी सायंकाळपर्यंत अाणखी दाेन मृतदेहांचा शाेध लावण्यात ‘एनडीअारएफ’चे जवान यशस्वी ठरले. या दुर्घटनेत ४२ प्रवासी बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज असून अाजपर्यंत त्यापैकी केवळ २६ मृतदेहच सापडले अाहेत.

  सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पुन्हा एकदा महाड येथील दुर्घटना स्थळाला भेट दिली. शोध मदत कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अाढावा घेतानाच शिंदेंनी त्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. त्यांच्या समवेत स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले होते. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही भेट देऊन अाढावा घेतला. शनिवारी संध्याकाळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही घटनास्थळी भेट देऊन अाढावा घेतला हाेता.
  , तसेच मृतांच्या नातलगांचे सांत्वनही केले. जाेपर्यंत बेपत्ता वाहने प्रवाशांचा शाेध लागत नाही ताेपर्यंत शाेधकार्य सुरूच राहिल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात अाले.  सावित्री पूल दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी अखेर एसटीचे तसेच इतर वाहनांचे अवशेष शोधण्यात नौदलाला यश मिळाले. शनिवारी 2 मृतदेह सापडले असून यापैकी एक तवेरा गाडीमधून प्रवास करणाऱ्या दिनेश कांबळीचा आहे. दुसऱ्या मृतदेहाची ओळख मात्र पटलेली नाही. रविवारी सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. त्‍यामुळे मृतांची संख्या आता 27 झाली असून 41 बेपत्ता व्यक्तीपैकी अजूनही 16 जणांचा शोध लागलेला नाही. नौदलाच्या पथकाबरोबरच पाणबुडे तसेच अत्याधुनिक कॅमेराचा वापर या मोहिमेत केला जात आहे.

  जोरदार पाऊस, नदीचा प्रचंड वेग यामुळे मृतदेह १२० कि .मी. अंतरापर्यंत वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हाप्रळच्या खाडीत कांबळीचा मृतदेह आढळला. शनिवारी अत्याधुनिक अंडरवाॅटर कॅमेराच्या साहाय्याने वाहनांची शोध घेण्याची मोहीम नव्याने सुरू करण्यात आली. हे कॅमेरे ७०० फुट खोल तसेच ४०० फुट रूंद भागाचा शोध घेऊ शकतात. एसटीचा तसेच इतर वाहनांचा शोध लागत नसल्याने शोध यंत्रणेवर दबाव वाढत असताना चौथ्या दिवशी सावित्री पूलापासून ३ कि .मी. अंतरावर नौदलाला एसटी तसेच इतर वाहनांचे काही अवशेष मिळाले.
  सावित्री पुलावरून वाहून गेलेल्या दोन्ही एसटी बसेस पुलापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दादली पुलापर्यंतच्या भागातच असाव्यात, असा शोध पथकांचा अंदाज आहे. त्यामुळे तटरक्षक दल आणि एनडीआरएफ ने वाहनाचा शोध घेण्याची मोहीम याच तीन किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये केंद्रित केली आहे. त्यांच्या दिमतीला तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सहभागी आहे.

  या भागात नदीचे पात्र खोल आहे. येथेच एसटी बसचा एक फायबरचा तुकडा आणि तवेराच्या कॅरियरचे स्टँड आढळून आले. त्यामुळे वाहने याच भागात खोलवर सांगाड्यांच्या स्वरूपात असावीत आणि अद्यापही या वाहनांमध्ये काही मृतदेह अडकून पडले असावेत, असा पथकांचा अंदाज आहे. चौथ्या दिवसानंरही नदीपात्रातून वाहून जाणारे मृतदेह स्थानिक ग्रामस्थ आणि वाळू व्यावसायिकांना आढळले.
  तरंग लहरींवर काम करणारे उपकरण आणले
  सावित्री नदीत बुडालेल्या वाहनांचा शोध घेण्यासाठी तरंग लहरींवर काम करणारे अत्याधुनिक उपकरण आणण्यात आले आहे. त्याच्या मदतीने पाण्याखाली सुमारे 700 मीटर पर्यंतची वस्तू शोधणे शक्य होणार आहे. त्यामुळे शोध मोहिमेला गती मिळणार नाही. अमेरिकन बनावटीचे हे उपकरण आहे. केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी घटनेची आणि राबविण्यात येणाऱ्या शोध मोहिमेची माहिती घेतली.
  महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेची जबाबदारी सरकारची : गडकरी
  सरकार म्हणून महाड येथील सावित्री पूल दुर्घटनेची सर्वस्वी जबाबदारी आमची आहे, अशा शब्दांत जबाबदारी स्वीकारताना ६ महिन्यांत २८ कोटी रुपये खर्च करून सावित्री नदीवर नवीन पूल बांधण्यात येईल, अशी घोषणाही केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली. केंद्र सरकारने हा पूल खचल्याची जबाबदारी स्वीकारल्याने राज्य सरकारने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सावित्री नदीवरील पूल हा गडकरी यांच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची देखरेख केली जाते. मात्र, पुलाचे नियंत्रण आणि देखरेख, डागडुजी करण्याची , त्यासाठी निधी देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच असते. या पार्श्वभूमीवर जबाबदारी कोणी घ्यायची असा वाद सुरू असताना शेवटी केंद्राने ही जबाबदारी स्वीकारली.
  गडकरी म्हणाले, मुंबई-गाेवा महामार्गाचे चौपदरीकरण वेगात होईल. या महामार्गावर ब्रिटिशकालीन २२ पेक्षा अधिक पूल असून पनवेल ते इंदापूर या रस्त्याचे चौपदरीकरण करणे हे मोठे आव्हान आहे. हा महामार्ग पूर्ण करून जनतेचे वर्षोनुवर्षे होणारे हाल लवकरच कमी होतील, असेही त्यांनी सांगितले. जमिनीच्या संपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सावित्री पुलाच्या कामासाठी केंद्र सरकार सर्वताेपरी मदत करणार असून कामाच्या निविदा लवकरात लवकर काढून १८० दिवसांत नवा पूल उभा केला जाईल. विशेष म्हणजे हा पूल ज्या मुंबई-गोवा महामार्गावर उभा आहे त्याच्या चौपदरीकरणाला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
  या महामार्गावर जमिनीच्या संपादनाचे काम खूप अडचणीचे असले तरी आम्ही यामधून मार्ग काढला असून लोक सहकार्य करायला लागले आहेत. माझे या भागातील जनतेला आवाहन आहे की आवश्यक तेथे सहकार्य करा. तुमचे सहकार्य आणि केंद्राच्या कामाचा वेग याचा मेळ झाला तर येत्या दोन वर्षांत या महामार्गाचे चौपदरीकरण नक्की होऊ शकते, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

  आघाडीच्या काळात भूसंपादन संथ
  आघाडी सरकारच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने झाल्याने चौपदरीकरणाचे काम रखडले होते. मात्र भाजपचे सरकार येताच मी स्वत:पुढाकार घेऊन हा महामार्ग लवकर पूर्ण कसा होईल, यासाठी पुढाकार घेतला आहे. कारण मला महाराष्ट्राची माहिती आहे. या महामार्गावर वर्षाला शेकडोंनी लोकांना आपले प्राण हकनाक गमवावे लागतात, हे दिसत असल्याने वेगाने चौपदरीकरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. यामुळे मी बैठका घेतल्या. लोकप्रतिनिधींना बोलावून लोकांकडून सहकार्य मिळवण्याची जबाबदारी तुमची आहे. मी पैसे द्यायला तयार आहे, लोकांकडून जमीन संपादन करून घेण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. यात राजकारण आणता कामा नये. अन्यथा मी निधी परत घेऊन जातो, असेही त्यांनी सांगितले.

  आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणावर पडदा
  पावसाळी अधिवेशनात सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळे विरोधकांनी फडणवीस सरकारला घेरले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. संसदेतही या दुर्घटनेचे पडसाद उमटले. गडकरी यांनी दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणावर अखेर पडदा टाकला.

  पोस्टमार्टम न करण्याचे आदेश
  आढळून येत असलेले मृतदेह पाण्यात बराच काळ राहिल्याने ते फुगलेले असून माशांनीही कुरतडेल्या स्थितीत सापडत आहेत. मृतदेहांची अत्यंत वाईट अवस्था असल्याने नातेवाईकांच्या भावना लक्षात घेऊन या मृतदेहांचे पोस्टमार्टम न करता आवश्यक नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक प्रकाश बोरुडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
  अशी राबवली जात आहे शोध मोहिम
  तटरक्षक दल व हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे गेले तीन दिवसांपासून अखंडितपणे शाेधकार्य सुुरू अाहे. एनडीआरएफच्या चार पथकातील १६० जवान हे नऊ बाेटी तसेच अाठ डायव्हर्सद्वारे अथक शोधकार्य करत अाहेत. तसेच याचबरोबर स्थानिक पातळीवरील ३५ पट्टीचे पोहणारे नागरिक, ५ राफ्टरर्स, ६ केकेज् टीम, स्थानिक मच्छीमारांचीही बचावकार्यात मदत हाेत अाहे. स्थानिक ३०० पाेलिस व अधिकाऱ्यांचा ताफा व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली सहा डॉक्टरांचे पथक १२ रुग्णवाहिकेसह या भागात कार्यरत आहे.
  आतापर्यंत सापडले 27 मृतदेह
  पहिल्या दिवशी बुधवारी दाेन तर गुरुवारी 12 मृतदेह सापडले हाेते. शुक्रवारी अाणखी दहा मृतदेह सापडले. आतापर्यंत एकुण 27 मृतदेह सापडले असून त्यापैकी 21 जणांची अाेळख पटली अाहे. तर गंगाखेड तालुक्यातील बसचालक गाेरखनाथ मुंडे यांच्यासह किमान 16 प्रवासी अजून बेपत्ता अाहेत. सावित्री नदीपात्रात ३० किलाेमीटर्सच्या परिसरात त्यांचे शोधकार्य सुरू आहे. मृतदेह पाण्याच्या प्रवाहासाेबत दूरवर वाहून गेल्याचे एनडीआरएफ व अन्य शोधपथकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यात महाड परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढला असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत.
  ३०० किलो चुंबकाने वाहनांचा शोध सुरू
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, बेपत्ता बस व वाहनांचा ३०० किलो वजनाचे चुंबकाचा वापर करून शोध सुरू आहे.
  मुदत संपली तरी बॅरिअर बांधून सुरू हाेती पुलावरून वाहतूक !
  मंगळवारी मध्यरात्री महाडजवळील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातामागचे वास्तव समोर आले आहे. महाड, पाेलादपूर तालुक्यांना जोडणारा नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटिशकालीन पूल अखेरच्या घटका मोजत हाेता. िवशेष म्हणजे या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिनमधील पूल उभारणाऱ्या यंत्रणेने सरकारला पाठवलेली हाेते. मात्र तरीही राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे साफ दुर्लक्ष करून गोव्यावरून मुंबईकडे येणारी एकेरी वाहतूक सुरू ठेवली. त्याचीच परिणिती या भीषण दुर्घटनेत झाल्याचे समाेर अाले अाहे.
  १९२८ मध्ये बांधकाम
  सावित्री नदीवर दोनपैकी एक पूल ब्रिटिशकाळात १९२८ मध्ये बांधण्यात आला. याची लांबी १५४.७० मी. व रुंदी ११.१० मी. होती. याच्या समांतर नवा पूल १९९९-२००० मध्ये झाला. नव्या पुलाची लांबी १८४ मीटर व रुंदी ९.१० मीटर आहे.
  अरबी समुद्रापासून अवघे 18 किमी अंतर
  दुर्घटनाग्रस्त पूल अरबी समुद्रापासून अवघ्या 18 किमी अंतरावर आहे. तटरक्षक दलाची जहाजे, बोटी व जवान शोधकार्यात उतरले आहेत.
  पुढील स्लाईडवर वाचा...
  - प्रकाश मेहतांची माफी दिलगिरी
  - महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता बंद
  - चालकाचा मृतदेह 130 किमीवर
  - महाडच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार
  - महाड पूल दुर्घटनेत संपूर्ण कुटूंब बेपत्ता
  - जुन्या पुलांचे सेफ्टी ऑडिट करणार : मुख्यमंत्री
  - बचाव कार्यात हेलिकॉप्टर व बोटींचा वापर
  - अवैध वाळू उपसा भोवला
  - ब्रिटिशांना जबाबदारीची जाणीव
  (Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  पाचव्या दिवशीही शोध मोहिम राबवण्यात येत आहे.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  बेपत्ता प्रवाशांचा नदीत शोध घेतला जात आहे. इन्सेटमध्ये नदीत सापडलेला बसचा एक पत्रा.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन मदत कार्याची माहिती घेतली. इन्सेटमध्ये नदीत सापडलेला एसटीचा फलक.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  सावित्री नदीत वाहून गेलेल्या एका बसचा फलक काल सापडला. त्यावरुन बसची काय अवस्था झाली असेल असा विचार मनात येतो.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज घटनास्थळाला भेट दिली.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  बोटींच्या खाली उपकरणे लावून तरंग लहरींच्या मदतीने अवशेषांचा शोध घेतला जात आहे.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी पत्रकाराबद्दल अपशब्द वापरल्याने नाराजी पसरली आहे.
  प्रकाश मेहतांची माफी दिलगिरी  
  या दुर्घटनेसंदर्भात प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी दम भरला हाेता.  तसेच मेहतांच्या समर्थकांकडून धक्काबुक्कीही झाली हाेती. त्यामुळे मेहतांवर पत्रकार व राजकीय पक्षांनी राेष व्यक्त केला हाेता. परिणामी मेहतांनी माध्यमांची माफी मागितली. तर झाल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. 
   
  मृतांची नावे
  श्रीकांत शामराव कांबळे (चालक) शेवंती मिरगल, संपदा संतोष वाझे, आवेद अल्ताफ चौगुले,  पांडूरंग घाग, प्रशांत प्रकाश माने, स्नेहा सुनिल बैकर, प्रभाकर बाबुराव शिर्के,  रमेश गंगाराम कदम, मंगेश राजाराम काटकर,  सुनिल महादेव बैकर, अनिश संतोष बेलेकर, अतिफ मेमन चौगुले बाळकृष्ण बाब्या वरक, अजय सिताराम गुरव, विजय विश्राम पंडित, विनिता विजय पंडित. संतोष सोनू गवतडे, दिपाली कृष्णा बेलेकर, भिकाजी रामचंद्र वाघदरे, सुरेश देऊ सावंत. एकाची अाेळख अजून पटलेली नाही.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  पावसाचा जोर ओसरल्याने नौदलाचे पथक सावित्री नदीत उतरले असून शोधमोहिम सुरु आहे.
  महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता बंद
  दरम्यान, महाबळेश्वर-पोलादपूर घाटातील रस्ता दरीत कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संततधार पावसामुळे महाबळेश्वर-पोलादपूर घाटाची दुरवस्था झाली आहे. घाटातील रस्ता खचून एक हजार फूट खोल दरीत कोसळला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंंद करण्यात आलेला आहे.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  नदीत सापडलला सहावा मृतदेह एसटीने मुंबईला जाणाऱ्या आवेश चौगुलेचा मृतदेह सापडला. तो चिपळूून येथील राहाणारा आहे.
  चालकाचा मृतदेह 130 किमीवर
  गुरूवारी सकाळी आंजर्ले खाडीमध्ये एसटी चालक एस.एस. कांबळेंचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळापासून 130 कि.मी.वर हा मृतदेह आढळला. कांबळे हे जयगड- मुंबई एसटीचे बसचालक होते. अंगावर खाकी वर्दी व बॅच आढळल्याने कांबळेची ओळख पटू शकली. त्यानंतर 80 कि.मी. अंतरावरील हरिहरेश्वर येथे एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर महाडनजिक केम्बुर्ली दासगाव आणि दादली पूल या ठिकाणी प्रत्येकी एक- एक मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आले. हे सर्व मृतदेह त्या त्या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला कळवून त्यांच्या ताब्यात दिले आहेत. सापडलेले सर्व मृतदेह महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून त्यांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे काम सुरु अाहे. राजापूर -मुंबई , जयगड -मुंबई आणि इतर वाहनातून प्रवास करीत असलेल्या बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक यांनी महाड येथे एकच गर्दी केली होती.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  अजूनही दुथडी भरून वाहाणार्‍या सावित्री नदीत शोधकार्य सुरुच आहे.
  महाडच्या दुर्घटनेची न्यायालयीन चाैकशी होणार
  महाड दुर्घटनेतील पूल कोसळण्याच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. राज्यातील सर्व जुन्या पुलांचे सर्वेक्षण करुन नवे पूल बांधण्याचा कालबद्ध कार्यक्रम शासन हाती घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सावित्री नदीवरील पूल कोसळण्याच्या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशीही विधानसभेत उमटले. “पूल वाहून गेल्याने ४० ते ५० लोक दगावल्याची शक्यता अाहे. याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे,’ असा मुद्दा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला. तर “प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींवर खापर फोडले जाते. अधिकाऱ्यांना कोणी जाब विचारणार आहे का,” असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  दुर्घटना टाळता आली असती, ही मानवनिर्मित आहे, असे केंंद्रीय मंंत्री अनंत गिते यांनी म्हटले आहे.

  महाड पूल दुर्घटनेत संपूर्ण कुटूंब बेपत्ता

  गुहागरच्या तहसिलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, या तालुक्यातील असलेले आणि मुंबईत राहाणारे मिरगल कुटुंबीय खासगी गाडीने (एमएच 04 – 7837) याच काळात मुंबईला गेले असून त्यांचा अजून तपास लागलेला नाही. त्यामुळे तेही या अपघातात सापडले असण्याची भीती आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे– जयवंत सखाराम मिरगल (वय 40), बाबा सखाराम मिरगल (वय 36), जयवंती सखाराम मिरगल (वय 70, तिघेही रा.वाकोला, सांताक्रुझ, दत्त मंदिर, मुंबई), दत्ताराम भागोजी मिरगल (वय 61, रा.छप्परपाडा, सानपाडा, नवी मुंबई), संपदा संतोष वाजे (वय 37), संतोष सिताराम वाजे (वय 40, दोघेही रा.अमृतनगर, गणपती मंदिराजवळ, घाटकोपर, मुंबई), आदीनाथ कांबळे (वय 45, रा.जोगेश्वरी, मुंबई) व दिनेश सखाराम कांबळे (वय 40, रा.बोरीवली, मुंबई) या गाडीच्या चालकाचे नाव समजलेले नाही.

 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  एनडीएरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डचे मिळून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

  जुन्या पुलांचे सेफ्टी आॅडिट करणार : मुख्यमंत्री

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर घटनास्थळी दाखल झाले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जुन्या पुलांचे आॅडिट करण्याची घोषणा केली. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे ते म्हणाले.

 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  आंंतर्ले समुद्र किनार्‍यावर दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.

  बचाव कार्यात हेलिकॉप्टर व बोटींचा वापर

  88 वर्षांपूर्वीच्या या पुलाचा 80 टक्के भाग वाहून गेला. रात्री माहिती मिळताच रायगड जिल्हा प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले. तातडीने मदत व बचावकार्य सुरू झाले. या कार्यात हेलिकॉप्टर व बोटींचा वापर केला जात आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या बचावकार्यात बुधवारी रात्रीपर्यंत दोन मृतदेह हाती लागले होते. मात्र, कोणतेही वाहन सापडलेले नाही. या दुर्घटनेनंतर राज्य विधानसभेत विरोधी पक्षांनी राज्य सरकारच या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप करत संबंधित मंत्र्यांवर हत्यांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.मुंबईपासून १७५ किमी अंतरावर झालेल्या या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली. या मार्गावर दोन समांतर पूल आहेत. यातील एक पूल नवा आहे. जुना पूल १९२८ मध्ये बांधण्यात आला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून मदत व बचावकार्याची माहिती घेतली.

 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  बचावकार्यादरम्यान जवानांंची एक बोट उलटली होती. पण सुदैवाने सर्वजण सुखरुप

  अवैध वाळू उपसा भोवला

  व्यवसायाने अभियंता असलेले रायगड येथील रहिवासी सुयोग शेठ यांनी या भागातील अवैध वाळू उपशामुळे पुलाचा पाया कमकुवत झाल्याचा आरोप केला. याबाबत स्थानिक प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, याची गंभीर दखल घेतली गेली नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे.

 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  वाहून गेल्या वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसचा समावेश आहे.

  तात्पुरती डागडुजी

  विधानस परिषदेत महसूल व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या मुलाची तपासणी मे २०१६ मध्ये झाली होती. तेव्हा हा पूल दुरुस्त करून वाहतुकीस योग्य असल्याचे सांगण्यात आले होते.

 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  जयगड- मुंंबई बसचेे चालक एसएस कांंबळेे व त्यांंचा मुलगा महेंंद्र कांंबळे (वय-17)

  मदतकार्यात...
  - ४० जवान एनडीआरएफच्या दोन पथकांचे
  - ३५ स्थानिक पाणबुडे
  - ७ तराफ्यांची मदत

 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  ब्रिटिशांना जबाबदारीची जाणीव
  भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी देश सोडल्यावरही आपल्या देशातील त्यांनी उभारलेल्या वास्तूंविषयी माहिती जपणूक केली होती. काही वर्षांपूर्वी ब्रिटिश एजन्सीने भारत सरकारला रायगड जिल्ह्यातील माणगाव व महाड येथील सावित्री नदीवरील पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली असून ते नव्याने बांधा अथवा त्याची योग्यता डागडुजी करण्याचे एका पत्राद्वारे सूचित केले होते. या पुलालगत १० वर्षांपूर्वी एक नवीन पूल बांधण्यात आला. परंतू या जुन्या पुलावरून आजही एकेरी वाहतूक राष्ट्रीय महामार्गाने का सुरु ठेवली गेली, असा प्रश्न आता प्रश्न उपस्थित झाला आहे. काही वर्षांपूर्वी या पुलाची डागडुजी म्हणून तुटलेल्या संरक्षक भिंतीच्या जागी क्रश बॅरिअर बसविण्याचे थातुरमातुर काम उरकून डागडुजी केल्याचे भासविण्यात आले होते.
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
 • ST Buses, Private Vehicles Still Missing
  सावित्री नदीच्या पुरात वाहून गेलेल्या एका बसचे अवशेष सापडले आहे (इन्सेटमध्ये). नदीत सापडलेला मृतदेह नेताना. )

Trending