आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Home Minister Thane Tour And Robbery Issue

गृहमंत्र्याच्या दौर्‍यातही चोरट्यांचा सुळसूळात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- मुळात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यात राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटी‍ल यांच्या दौर्‍यातही चोरट्यांचा सुळसूळात झाल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे शहराच्या दौर्‍यावर गृहमंत्री पाटील आले असता त्यांच्या बंदोबस्ताला ही चोरटे घाबरले नाहीत. मंगळवारी चोरट्यांनी शहरात अक्षरश: धुडगूस घालत दोन लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज लूटून नेला.

मंगळवारी भर दुपारी चिंतामणी चौकात चोरट्यांनी वृद्धाची बॅग लांबविली. त्यात बॅंकेचे पासबुक आणि 10 हजार रुपये रोख होते. तसेच चरईतील श्री स्वामी समर्थ वास्तू बिल्डिंगमधील रहीवासी अशोक टिल्लू यांच्या घराच्या दरवाज्याचा लॉक तोडून चोरड्यांनी सोने- चांदीच्या दागिन्यांसह सुमारे दीड लाखांचा ऐवज लुटला. कळव्यात सोनसाखळी चोरीची घटना घडली.पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.