आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाचे कृष्णकृत्य उघड; मोबाईलमध्ये आढळली विद्यार्थिनीचे न्यूड फोटो!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- रायगड जिह्यातील मोठी जुई प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाची कृष्णकृत्ये चव्हाट्यावर आली आहेत. या शिक्षकाच्या मोबाईलच्या मेमरीकार्डात विद्यार्थिनीचे नग्न छायाचित्रे आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या मोटी जुई प्राथमिक शाळेतील शिक्षक दत्ता जाधव याला विनयमंग प्रकरणात नुकताच जामीन मिळाला आहे. परंतु त्याचे आणखी कृष्णकृत्ये जगासमोर आली आहेत. या शिक्षकाच्या मोबाईलमधील मेमरीकार्डात याच शाळेतील आणखी एका विद्यार्थिनीचे नग्नावस्थेतील छायाचित्रे आढळून आले आहेत. त्यामुळे पालकांसह ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट उरण पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढून या भामट्याला पुन्हा अटक करण्‍याची मागणी केली. याप्रकरणाची दखल घेत आरोपी जाधव याला पनवेल येथील त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संबंधित विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरविण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
जाधव याने सातवीतील विद्यार्थिनीचा विनभंग केल्यामुळे यापूर्वी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला लगेच जामीनही मिळाला होता. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.