आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशीत चिमुकल्या मुलीसह पत्नीला जाळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील वाशी (ता. पेण) येथे राहणार्‍या उमेश गणेश पाटील या व्यक्तीने आपली पत्नी व सव्वा वर्षाच्या चिमुकलीला जिवंत जाळल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
उमेश पाटील हा आपली पत्नी चैताली व छोट्या मुलीसोबत वाशी गावात राहत होता. मात्र, उमेश व चैतालीमध्ये काही कारणावरून नेहमीच वाद होत असे. याच वादातून उमेशने पंधरा दिवसांपूर्वीच चैतालीला जाळून टाकण्याची धमकी दिली होती. गुरुवारी रात्री चैताली घरात नसल्याचे पाहून तिच्या सासूने शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या आईवडिलांकडेही चौकशी केली. घाबरलेल्या पालकांनी तातडीने उमेशचे घर गाठले. अधिक चौकशी केली असता घरापासून काही अंतरावर या दोघींना उमेशने जाळले असल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता चैताली व चिमुकलीचा मृतदेह दिसला. या प्रकरणी वडखळ पोलिसांनी उमेश, त्याचे वडील गणेश व आई शालिनी यांना ताब्यात घेतले आहे.