आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tarapur Nuclear Project Thane Get Short Film Award

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पावरील शॉर्ट फिल्मला पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांवर तयार करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्मला ब्राझील येथील युरेनियम फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘यल्लो पुरस्कार’ मिळाल्याची माहिती दिग्दर्शक प्रदीप इंदूलकर यांनी दिली. इंदूलकर मूळ तारापूर येथील रहिवासी आहेत. 1960 मध्ये अणुउर्जा प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर येथील नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले होते. हाच धागा पकडत इंदुलकर यांनी गेल्या वर्षी या विषयावर शार्ट फिल्म तयार करून युरेनियम फेस्टिव्हलमध्ये पाठवली. गेल्या शनिवारी झालेल्या सोहळ्यात या फिल्मला पुरस्कार मिळाला.