आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबरनाथ येथ्‍ो दहावीचा पेपर फुटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उल्हासनगर- अंबरनाथ (पं) येथे दहावीचा बीजगणिताचा पेपर काल(ता.14) काही मिनिटांपूर्वीच फुटला.पेपर फातिमा हायस्कूल जवळ एक टोळी विकत असल्याचे पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित टोळीविरूध्‍द कारवाई केली.
टोळीचा मुख्‍य सूत्रधार ब्रिलियंट क्लासेसचे संचालक फ‍िराज अब्दुल माजीद खान यांना अटक करण्‍यात आली.अंबरनाथ(पं)मधील फातिमा शाळेजवळ हा प्रकार घडला.शाळेचे परीक्षा नियंत्रक ऑशियन डिसूजा यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी खानला अटक केले.पेपरफुटीचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत जात असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास अंबरनाथ पोलिस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक शिवशंकर मुंडे करत आहेत.