आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या प्रकरणात जामीन नाकारला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - बिल्डर सुनील लहोरिया हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने विकासक आरोपीचा जामीन फेटाळला.आरोपी सुमीत बच्छेवार याच्याविरुद्ध गंभीर आरोप असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. या प्रकरणातील आरोपींची यादी मोठी आहे, त्यामुळे अर्जदाराच्या जामीन अर्जावर निकाल देण्याची ही योग्य नाही, असे न्यायाधीशांनी आदेशात म्हटले. लहोरिया यांच्या वाशी येथील निवासस्थानाबाहेर 16 फेब्रुवारी रोजी दोन बंदूकधार्‍यांनी त्यांची हत्या केली होती. मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात शूटर व्यंकटेश शेट्टीयार, आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट इमानुल अमोलिक यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.