आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे महापालिकेत एलबीटीला विरोध कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे : महाराष्‍ट्र शासनाने दिलेल्या एलबीटी लागू करण्‍याच्या निर्णयाला ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीत विरोध करण्‍यात आला.जकात कर कायम ठेवण्‍याची मागणी समितीच्या बैठकीत करण्‍यात आली आहे.

समितीचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी जकात वसूलीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला प्रशासनाने जकात वसूली चालू असल्याचे उत्तर दिले.यानंतर जगदाळे यांनी एलबीटी विरोध सुरू केला. उल्हासनगर,सांगली ,औरंगाबाद,मीरा-भाईंदर महापालिकेत एलबीटीची स्थिती वाईट आहे,असे सांगून स्थायी समितीचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी विरोध केला.एकंदरात पालिकेतील या घडामोडींमुळे एलबीटीचा मुद्दा अधंतर राहण्‍याची शक्यता आहे.