तरुणीवर तेल फेकणारा / तरुणीवर तेल फेकणारा 24 तासानंतरही बेपत्ता

दिव्य मराठी वेब टीम

Jul 29,2013 12:05:00 PM IST

ठाणे - उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ३ येथील हिराघाट परिसरात राहणा-या एका 21 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करणारा माथेफिरू अद्यापही बेपत्ता आहे. यामुळे उल्हासनगर आणि ठाणे परिसरातून संताप व्यक्त होत आहे. शनिवारी माथेफिरु तरुणाने तरुणीच्या चेह-यावर उकळते तेल फेकले होते. त्यानंतर 24 तास उलटूनही त्या माथेफिरूला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

उल्हासनगर येथील शिवाजी चौकातील एका दवाखान्यात पीडित तरुणी काम करते. याच भागात वडापाव विक्रीचा व्यवसाय करणा-या अजित तलरेजाशी काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र. तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे रागाच्या भरात अजितने ही तरुणी काम करत असलेल्या दवाखान्यात जाऊन तिच्या चेह-यावर उकळते तेल फेकले. पोलिसांनी अजितविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

एक दिवसआधीच मुंबईत लोकलमध्ये महिलवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर उल्हासनगरमधील या प्रकाराने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

X
COMMENT