आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारसाठी सव्वा कोटीचे कर्ज, बँक फसवणूक प्रकरणात दोघांवर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - 27 कारसाठी 1.30 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन शताब्दी महिला सहकारी बॅँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींची शोधमोहीम सुरू केली आहे. आरोपी जॉन्सी कोसे व मुकुंद मिर्शा यांनी नोव्हेंबर 2011 मध्ये बॅँकेच्या नवपाडा शाखेतून 27 कारसाठी 1.30 कोटी रुपये कर्ज घेतले होते. आरोपींच्या आरसी बुक व अन्य कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बॅँकेने कर्ज मंजूर केले. सुरुवातीचे काही महिने नियमित हप्ते भरल्यानंतर नंतर त्यांनी ते बंद केले. यामुळे बॅँक व्यवस्थापनाला कर्जदारांचा संशय आला.