आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे जिल्ह्याच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव, शिवसेना आमदारांकडून स्वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एक कोटी १० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्याचे त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव शासनाने मांडला आहे. या त्रिभाजनाचा अभ्यास करण्यासाठी महसुल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुंबई पासून जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाला आणि नागरिकांनाही प्रशासकीय कामात आडचणींचा सामना करावा लागतो. मुंबईपासून जवळ असला तरी ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग आहे. हे आदिवासी मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. याचा विचार करुन राज्य शासनाने ठाण्यातून कल्याण आणि वसई वेगळे करुन तीन जिल्हे करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ठाण्याच्या शिवसेना आमदारांनी या प्रस्तावाचे स्वागत केले असून, शासनाने लवकरात लवकर ठाण्याच्या त्रिभाजनाचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
ठाणे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला
ठाणे महापालिका स्थायी समितीसाठी मनसेचा पाठिंबा आघाडीला
मनसेचा राजमार्ग व्‍हाया ठाणे!