आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्‍यातील लग्‍नसोहळ्यात आदिवासी मुलीवर बलात्‍कार, दोघांनी दिला होता दम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- जिल्‍ह्यातील एका युवकाने 14 वर्षीय अादिवासी युवतीवर बलात्‍कार केला. एका विवाह सोहळ्यात ही घटना घडली. पीडित मुलगी लग्‍नासाठी आली होती. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार मोहिली गावातील मुलगी 18 एप्रिलला सोनटक्‍के या नातेवाईकांच्‍या गावात लग्‍नासाठी आली होती.
- उप निरीक्षक शीतल बामने यांनी सांगितले, विवाह सोहळ्यानंतर पीडित मुलगी विवाहस्‍थळी एका रुममध्‍ये झोपलेली होती.
- आरोपीने युवतीला जबरीने उठवले व एका निर्जन स्‍थळी नेले.
- आरोपीची ओळख पटली असून मयूर माकने (वय 19) त्‍याचे नाव असून तो वीटभट्टीवर काम करतो.
- बामने यांनी सांगितले की, आरोपीच्‍या ओळखीतील दोघांनी पीडित मुलीला धमकावले.
- या प्रकाराबाबत कुणाला माहिती दिल्‍यास त्‍याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा दम त्‍यांनी तिला दिला.
- हरीश बॉम्बे आणि उदय बॉम्बे यांनी पीडित मुलीला धमकावले.
- भीतीपोटी पीडित मुलीने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली नाही.
- पीडित मुलगी आणि तीन आरोपी मोहिली गावातील बॉम्‍बे पाडा येथील रहिवाशी आहेत.
- पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
-पोलिस तिघांचाही शोध घेत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...