आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात अजुनही स्थायी समीती नाहीच ; ठाणॆकर संतप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - महापालिकेच्या स्थायी समितीसाठी राजकारण्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेमुळॆ सामान्य जनतेचे हाल होत आहेत. निधी अभावी अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळं संतप्त ठाणेकरांनी नेत्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. ठाण्यात स्थायी समितीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
निवडणुका होऊन सहा महिने उलटल्यानंतरही स्थायी समिती स्थापन झालेली नाही. राजकारण्याच्या या सत्तासंघर्षात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. अनेक समस्यांबाबत जनतेकडून जाब विचारला असता निधी नसल्याचे नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. ठाणेकरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पेट्रोल,डिझेल जकात कर कमी करण्याचा प्रस्ताव तसाच आहे.. परिवहन संदर्भातली प्रश्नांचीही तशीच अवस्था आहे.. त्यामुळे आता नेत्यांच्या या राजकारणावर ठाणेकरांमध्ये संतापाची भावना आहे.. ‘आता तरी स्थायी समितीचा प्रश्न सोडवा अन्यथा जनआंदोलनासाठी तयार रहा’ असा इशारा ठाणेकरांनी या राजकारण्यांना दिलाय.