Home | Maharashtra | Kokan | Thane | Today Shivaji Maharaj Cornarston Function Celebrating On Raigad

आज रायगडावर शिव राज्याभिषेक दिन होणार साजरा

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jun 06, 2013, 01:47 PM IST

गुरूवारी(ता.6) रायगडावर शिवाजी महाराजांचा 340 वा राज्याभिषेक दिन साजरा करण्‍यात येणार आहे.

  • Today Shivaji Maharaj Cornarston Function Celebrating On Raigad

    रायगड - गुरूवारी(ता.6) रायगडावर शिवाजी महाराजांचा 340 वा राज्याभिषेक दिन साजरा करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीने केले आहे. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्‍येने शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजी महाराज, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

    रायगडाच्या परिसरात शिव राज्याभिषेकासाठी येणा-या लोकांच्या स्वागतासाठी ठ‍िकठिकाणी कमानी उभारण्‍यात आल्या आहेत. संपूर्ण गड हा श‍िवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमत आहे.

Trending