आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tomorrow Thane Corporation Starts Action Against Ilegal Construction

ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरूध्‍द कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - शिळफाट्या येथे अनधि‍कृत सात मजली इमारत कोसळून 74 जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला आता जाग आली आहे. ठाण्‍यातील अनधिकृत बांधकाम पाडण्‍यासाठी ठाणे मनपाने 15 जणांची विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. उद्यापासून मनपा अनधिकृत बांधकामांविरूध्‍द मोहिम सुरू करणार आहे.

अनधिकृत बांधकामप्रकरणी बिल्डरांना वाचवण्‍यासाठी लाखो रूपयांची लाच देण्‍यात आली असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. बेकायदेशीररित्या जमीन ताब्यात घेणे, ठाणे पालिकेची परवानगी न घेणे, निकृष्‍ट दर्जाचे बांधकाम, लोकांना राहण्‍यास भाग पाडणे व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बिल्डर अब्दुल स‍िद्दिकी , ज‍मील अहमद , महापालिका उपायुक्त दीपक चव्हाण, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब आंधळे, वरिष्‍ठ लिपिक किसन मडके, राष्‍ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील, बांधकाम साहित्याचा पुरवठादार अफरोज अन्सारी, पोलिस हवालदार जहांगीर सय्यद, दलाल पटेल यांच्यावर वरील आरोपी निश्चित करण्‍यात आली आहेत, असे ठाणे पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी सांगितले. सगळीकडून दबाव वाढल्यानंतर महापालिका उद्या अनधिकृत बांधकामांविरूध्‍द कारवाई करणार आहे.