ठाण्यात एलबीटीविरोधात व्यापार्‍यांचा / ठाण्यात एलबीटीविरोधात व्यापार्‍यांचा बंद; मनसे कार्यकर्ते रस्त्यावर

May 18,2013 03:52:00 PM IST

ठाणे- ठाण्यातील व्यापार्‍यांनी एलबीटीविरोधात शनिवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे व्यापार्‍यांच्या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला असून मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. बंदची हाक मागे घ्या, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचाही इशारा मनसेने दिला आहे. काही भागा‍त मनसे कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांनी बंद दुकानांचे शटर परस्पर उघडून बंद उधळला.

दरम्यान, अक्षय्य तृतीच्या निमित्ताने ठाण्यातील दुकानदारांनी शहरात दुकाने उघडली होती. परंतु आजपासून पुन्हा एकदा बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाणेकरांची चांगलीच फरफट होणार आहे.

ठाण्यातील व्यापार्‍यांमध्ये फूट पडल्याचेही चित्र दिसत आहे. एकीकडे व्यापार्‍यांनी एलबीटीला विरोध केला आहे तर दुसरीकडे काही व्यापाऱ्यांनी एलबीटी भरायला सुरूवात केली आहे.

X