Home | Maharashtra | Kokan | Thane | Traffic police arrest gold chain snatcher in Thane

Social Media: पोलिसांच्या प्रसंगावधानाने सापडले सोनसाखळीचोर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 19, 2015, 03:01 PM IST

महिलेचा आरडाओरडा ऐकून एक ट्राफिक पोलिस दुचाकीस्वारांना पकडतो. त्याच्या मदतीला इतरही पोलिस येतात.

 • Traffic police arrest gold chain snatcher in Thane
  दुचाकीवर मागच्या सीटवर बसलेल्या युवकाने महिलेची सोनसाखळी ओढून नेली.
  ठाणे- दुचाकीवर असलेले दोन सोनसाखळीचोर ट्राफिक पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने सापडल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ठाण्याच्या कोणत्या भागात ही घटना घडली याची नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी ही पोस्ट कालपासून ऑनलाईन जगात फिरत आहे. यात दुचाकीवरील दोन तरुण रस्त्यावरुन जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरताना दिसतात. या महिलेसोबत एक मुलगीही या फोटोत दिसते. त्यानंतर महिलेचा आरडाओरडा ऐकून एक ट्राफिक पोलिस दुचाकीस्वारांना पकडतो. त्याच्या मदतीला इतरही पोलिस येतात. त्यानंतर सोनसाखळी चोरांना पोलिस ठाण्यात आणले जाते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जातो.
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, इतर फोटो... असे पकडले सोनसाखळी चोराला....

 • Traffic police arrest gold chain snatcher in Thane
  महिलेने आरडाओरडा केल्याने ट्राफिक पोलिस सतर्क झाला.
 • Traffic police arrest gold chain snatcher in Thane
  त्याने दोघांची दुचाकी धरुन ठेवली.
 • Traffic police arrest gold chain snatcher in Thane
  त्यानंतर इतरही पोलिस त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावले.
 • Traffic police arrest gold chain snatcher in Thane
  त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

Trending