आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्‍याणजवळ रेल्‍वे अपघातात चार कर्मचारी ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्‍याण- कल्‍याण-ठाकुर्ली रेल्‍वे स्‍टेशनदरम्‍यान फास्‍ट ट्रॅकवरून वेगाने जात असलेल्‍या मुंबई-कोल्‍हापूर कोयना एक्‍स्‍प्रेसखाली चिरडून रेल्‍वेच्‍या चार गँगमनचा मृत्‍यू झाला. पत्री पुलाजवळ ही घटना घडली.

रेल्‍वे प्रशासनाने अपघाताच्‍या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे गँगमन रेल्‍वे ट्रॅकच्‍या पाहणीचे काम करीत होते, असे सांगण्‍यात येत आहे.