आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात आदिवासी महिलेवर पाच जणांकडून बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - मुंबई व परिसरात महिलांवरील अत्याचारांचे सत्र सुरूच असून ठाण्यातील अकोली येथील एका 35 वर्षीय आदिवासी महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. घटनेनंतर सागर हडळ (21), संजय आरांडे (30), मोहन कडक (32), जगदीश गावित (22) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत, तर पाचवा आरोपी विनोद कुमार हा फरार झाला आहे. पीडित महिला ही अकोली येथील रहिवासी आहे. सोमवारी रात्री ती घरी जात असताना पाचही जणांनी तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. घटनेच्या दुसर्‍या दिवशी महिलेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर चौघांना अटक करण्यात आली.