मुंब्रा इमारत दुर्घटनाप्रकरणी / मुंब्रा इमारत दुर्घटनाप्रकरणी दोघांना जामीन

प्रतिनिधी

May 19,2013 12:05:00 PM IST

ठाणे - मुंब्रा येथील इमारत दुर्घटना प्रकरणात स्थानिक न्यायालयाने दोन आरोपींना जामीन मंजूर केला. ठाणे मनपा आयुक्त कार्यालयातील आरोपी अधिकार्‍याचा चालक रामदास बुरूड व बांधकाम साहित्य पुरवठादार अफरोज अन्सारी यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. बिल्डर आणि मनपा अधिकार्‍यातील लाचेच्या देवाणघेवाणीत बुरूडने मध्यस्थाचे काम केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. न्यायालयाने पोलिस कॉन्स्टेबल जहांगीर सय्यद, मनपा अभियंता सुभाष रावल आणि मनपा अधिकारी सुभाष वाघमारे, किसन मडके आणि विष्णू गुमरे यांचा जामीन अर्ज फेटाळला. मनपा उपायुक्त दीपक चव्हाण, र्शीकांत सरमुकदम आणि सहायक मनपा आयुक्त श्याम थोरबोले, अभियंता रमेश इनामदार यांचे जामीन शुक्रवारी फेटाळण्यात आले होते.

X
COMMENT