आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे दुर्घटना प्रकरणी आणखी दोघे अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा येथील इमारत दुर्घटना प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली. यामुळे आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये मुंब्य्रातील एका पत्रकाराचा समावेश आहे.
आर्किटेक्ट फारूक अब्दुल(59) व स्थानिक पत्रकार रफिक दाऊद कामदार(44) या आरोपींनी अधिकाºयांकडून काम करुन घेण्यासाठी मध्यस्थी केल्याचा आरोप आहे. ठाणे गुन्हे शाखेने त्यांना सोमवारी अटक केली. अटकेतील एका बिल्डरच्या डायरीत कामदारच्या नावाचा उल्लेख होता. याआधी अटक केलेल्यांमध्ये निलंबित मनपा आयुक्त दीपक चव्हाण, सहाय्यक मनपा आयुक्त बाबासाहेब अंधळे आदींचा समावेश आहे.